Raj Thackeray after Vidhan Sabha Elections: त्या एकमेव विजेत्याला राज यांनी दिलं आपलं 'सिंहासन' (Watch Video)
भेटायला गेलेल्या सर्वच उमेदवाराचं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल (ऑक्टोबर 24) निकाल लागला. भाजप पक्षाला सर्वात जास्त मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक्सिट पोलला फेल ठरवत मोठी मुसंडी मारली. पण याच मतमोजणीच्या दिवशी विशेष होते ते म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिंकलेली एक जागा.
कल्याण ग्रामीण या मतदारसंघात मनसेच्या प्रमोद उर्फ राजू पाटील (Pramod Patil) यांची लढत शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांच्याशी होती. परंतु, अत्यंत चुरशीच्या या लढतीत मनसेने बाजी मारली आणि अखेर पक्षाचे खाते उघडले.
Raj Thackeray यांच्या मनसे चे एकमेव विजेते प्रमोद पाटील कोण आहेत? वाचा सविस्तर
मनसेच्या एकमेव विजयी उमेदवारासोबत इतर सर्व उमेदवारांनी आज (ऑक्टोबर २५) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटायला गेलेल्या सर्वच उमेदवाराचं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केलं.
विशेष म्हणजे राज यांनी राजू पाटील यांना स्वतःची खुर्ची देत त्यावर बसण्यास सांगितलं. आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
पाहा हा व्हिडिओ
महाराष्ट्र नवनिर्मण सेनेच्या अनेक उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना मतांच्या आकड्यांनी चांगली टक्कर दिली. ठाण्यातील अविनाश जाधव आणि डोंबिवलीतील मंदार हळबे यांनी विरोधी उमेदवाराला चांगली लढत देऊन सुद्धा त्यांना काही मतांनी पराजय स्वीकारावा लागला.