Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Gehana Vasisth ला Mumbai Sessions Court कडून Interim Relief नाहीच; 6 ऑगस्टला पुढील सुनावणी

गहनाने काही दिवसांपूर्वी व्यावसायिक आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटकेत असलेल्या पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अटकपूर्व जामीन (anticipatory bail) साठी अर्ज केला होता.

Gehna-Vasisth | File Image

मुंबई मध्ये पॉर्न फिल्म केस (Pornography Case) मध्ये अभिनेत्री गहना वसिष्ठ (Gehana Vasisth) समोर देखील अडचणी वाढत आहेत. दरम्यान आज मुंबई सेशन कोर्ट कडून अभिनेत्रीला अंतरिम जामीन नाकारण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे. गहनाने काही दिवसांपूर्वी व्यावसायिक आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटकेत असलेल्या पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अटकपूर्व जामीन (anticipatory bail) साठी अर्ज केला होता. Pornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स.

Gehana Vasisth ला फेब्रुवारी 2021 मध्ये चार महिने तुरूंगवास झाला आहे. नंतर तिला 2 FIRs मध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. गहनाचे वकील सुनील कुमार यांनी काही दिवसांपूर्वी मीडीयाला दिलेल्या माहितीमध्ये मुंबई पोलिसांकडून तिला 'साक्षीदार' म्हणून जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्याचा समंस आला असल्याचं सांगितलं होतं. मिडीया रिपोर्ट्सनुसार तिला राज कुंद्रासमोर काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी देखील बोलावल्याचं सांगितलं जात आहे. Gehana Vasisth: गहना वशिष्ठ एका पार्न व्हिडीओतून किती पैसे कमवायची? पोलीस चौकशीतून अशी माहिती आली समोर.

ANI Tweet

वेब सीरीज गंदी बात मधून गहना वशिष्ठ हे नाव चर्चेमध्ये आलं आहे. मुंबई पोलिसांनी तिला फेब्रुवारीत पॉर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. गहना वर असे आरोप आहेत की ती राज कुंद्रा च्या कंपनीसाठी पॉर्न फिल्मचं दिग्दर्शन करत होती. सध्या राज कुंद्रा देखील 19 जुलै पासून पोलिसांच्या ताब्यात असून त्याला देखील न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif