Gehana Vasisth: गहना वशिष्ठ एका पार्न व्हिडीओतून किती पैसे कमवायची? पोलीस चौकशीतून अशी माहिती आली समोर
अभिनेत्री आणि मॉडल गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) मुंबईच्या गुन्हे शाखेने प्रॉपर्टी सेलने रविवारी अटक केली आहे. वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ (Pornographic Video) शुट करून वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती.
अभिनेत्री आणि मॉडल गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) मुंबईच्या गुन्हे शाखेने प्रॉपर्टी सेलने रविवारी अटक केली आहे. वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ (Pornographic Video) शुट करून वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. गहना ही पोलीस कोठडीत असून याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, एक पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या बदल्यात तिला अमेरिकेतील एका व्यक्तीकडून दोन-अडीच लाख मिळायचे. यातील दीड लाख ती स्वत:ला ठेवायची. गहनाने आतापर्यंत 87 पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत. हे व्हिडिओ तिने तिच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून तिने लाखो रुपये कमवले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यामध्ये सिनेमा शूटिंगच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोठी हुशारीने मुंबई पोलिसांनी या बंगल्यांवर धाड टाकली. काही टोळ्या तरुण मुलींना सिनेमात मोठं काम देतो असं सांगून अश्लील व्हिडिओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणाच्या या प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या
गहना हीचे जन्मनाव वंदना तिवारी असून तिने भोपाळमधून रोबोटिक सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. गहना 'स्टार प्लस' वरील 'बहनें' या मालिकेत दिसली होती. गहनाने 2012 मध्ये मिस आशिया बिकने कॉन्टेस्टदेखील जिंकली आहे. याशिवाय, तिने गेल्या सहा वर्षात 30 पेक्षा अधिक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. गहना गेल्यावर्षी अल्ट बालाजीची सीरीज 'गंदी बात' आणि उल्लू अॅपच्या शोमध्ये दिसली होती. त्यानंतर तिला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2021 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

