महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यापासून पावसाचा वेग मंदावणार, हवामान खात्याचा अंदाज
तर पुढील आठवड्यापासून राज्यात पावसाचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.
महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता गायब झाल्याचे चिन्ह दिसून येत आहे. तर पुढील आठवड्यापासून राज्यात पावसाचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. परंतु तरीही काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. तरीही नागरिकांनी पावसाच्या शक्यतेप्रमाणे सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मात्र पुढच्या आठवड्यात पावसचा वेग कमी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे येथील घाटांवरसुद्धा पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र राज्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.(मुंबई हायकोर्टात महाराष्ट्रातील महापुराविरोधात याचिका दाखल)
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर-सांगली येथे महापुराची स्थिती निर्माण झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत होत अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत. मात्र आता पुराचे पाणी ओसरत आहे. तसेच राज्यातील विविध ठिकाणाहून या पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला जात आहे.