पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विदर्भ-मराठवाडा मात्र कोरडा ठक्क; अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई
कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, जालना, नागपूर, बुलडाणा, सातारा हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे़.
मान्सूनच्या (Monsoon) वाटेकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला अखेर दिलासा मिळाला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणारी जवळजवळ सर्व धरणे भरली आहेत. मात्र मराठवाडा आणि विदर्भ इथे अजूनही अपेक्षेपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, जालना, नागपूर, बुलडाणा, सातारा हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे़.
मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही तीव्र पाणीटंचाई आहे़. ‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. मात्र त्यानंतर घाटावरून हा मान्सून पुढे फारसा सरकला नाही़. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पिण्याच्या पाण्याची भ्रांत पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात धरण, तलाव, बंधारे अजूनही कोरडी ठक्क आहेत त्यामुळे या परिसरात लवकर पाऊस झाला नाही तर परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. (हेही वाचा: जालना: धामणा धरणाला तडे गेल्याने परिसरातील चार गावांना धोका)
1 जून ते 3 जुलैपर्यंत राज्यात 213 मिमी पाऊस झाला, मात्र हा सरासरी अपेक्षित पावसापेक्षा 11 टक्के इतका कमी आहे़. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला. तसेच धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. विदर्भात फक्त 1476 मिमी इतका पाऊस झाला आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.विदर्भ