Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्याकडून दिलगीरी व्यक्त; मतदार, काँग्रेस आणि मविआ कार्यकर्त्यांचीही मागितली माफी; कृषीप्रश्नांवर लढण्याचे आश्वसन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिखल येथे नियोजित सभा रद्द करावी लागली आहे. ज्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रातील चिखल येथे (Chikhli Rally Cancelled) सोयाबीन ( Soybean Farmers) आणि कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाहीर सभेला (Congress Rally) संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते आज सकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत माहिती दिली आहे. तसेच, काँग्रेस आणि महाविकासआघाडी कार्यकर्त्यांची माफी मागत मार्गदर्शनही केले आहे.
''भाजप अपयशी ठरला''
वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स (जुने ट्विटर) हँडलवरुन राहुल यांचा एक व्हिडिओ सामायिक केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "मी कँग्रेस आणि मविआची सभा घेण्यासाठी चिकळी येथे येणार होतो. मात्र, विमानातील तांत्रिक अडचणींमुळे आज (12 नोव्हेंबर) सकाळी मी येऊ शकलो नाही. तिथे माझी वाट पाहणाऱ्या प्रत्येकाची मी माफी मागतो. मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि पिकांच्या वाजवी किंमतींबद्दल त्यांच्या चिंता ऐकायच्या होत्या. या शेतकऱ्यांना पुरेसा पाठिंबा देण्यात भाजप अपयशी ठरला आहे. जेव्हा महाविकासआघाडी सरकार स्थापन करेल, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना अधिक चांगले उपाय आणि योग्य किंमत मिळावी यासाठी काम करू ". (हेही वाचा, Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार)
राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका आणि मल्लिकार्जून खडगे यांच्याही सभा
राहुल गांधींची ही सभा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचा भाग होती. ते आज दुपारी मुंबईत दाखल होतील आणि 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी नियोजित अतिरिक्त मेळाव्यांसह गोंदियामध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्यामध्ये ते काँग्रेस आणि महा विकास आघाडी (एमव्हीए) च्या मित्रपक्षांना, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला पाठिंबा आणि महाविकासआघाडीचा संयुक्त प्रचार करतील. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: पती विरुद्ध पत्नी, काका विरुद्ध पुतण्या! महाराष्ट्रात 'या' जागांवर होणार 'काटे की टक्कर')
राहुल गांधी यांचा मतदारांना संदेश
महाविकासआघाडीची मुंबई येथे जंगी सभा
मतदानाची तारीख जसजशी जवळ तसतसे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती विरोधात असलेल्या महाविकासआघाडी आणि घटक पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी तीव्र प्रयत्न करत आहे. दोन्ही बाजूंनी सभांचा धडाका लावला जात आहे. दरम्यान, महाविकासआघाडीची अंतिम सभा सभा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत होणार आहे, जिथे राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेते जनतेला संबोधित करण्याची शक्यता आहे. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकासआघाडी घटक पक्षाचे इतर नेतेही मोठ्या प्रमाणावर सभागी होतील. ज्यामध्ये डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतरही काही सामाजिक संघटनांचा समावेश आहे. या वेळची निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत अभूतपूर्व अशी निवडणूक आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून जाण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)