पुणे: लॉकडाऊनच्या काळात लॉजमध्ये राहण्यासाठी कंपनीचे पैसे वापरल्याने तरूणाला किडनॅप करून अमानुष मारहाण; जननेंद्रियात टाकले सॅनिटायझर
पुण्यामध्ये 30 वर्षीय एका व्यक्तीला कंपनी मालकासह तीन जणांकडून किडनॅप करून त्याचा शारिरीक छळ करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे.
पुण्यामध्ये 30 वर्षीय एका व्यक्तीला कंपनी मालकासह तीन जणांकडून किडनॅप करून त्याचा शारिरीक छळ करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. दरम्यान दिल्लीमध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात कंपनीच्या पैशांचा वापर करून हा तरूण राहिल्याने त्याचा हा छळ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरू आहे.
पुण्यामध्ये घडलेल्या या प्रकाराची तक्रार 2 जुलै दिवशी पौद पोलिस स्थानकामध्ये करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 13,14 जून दिवशी हा प्रकार घडला असून तरूणाने लॉकडाऊनमध्ये कंपनीचे पैसे वापरले असल्याचा दावा करण्यात आला आहे. PTI या वृत्त संस्थेने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोथरूडमध्ये 30 वर्षीय तरूणाला 3 जणांकडून किडनॅप करण्यात आले होते. हे देखील वाचा: मुंबई: चेंबूर येथे कोविड19 ऑफिसर सांगत एका तरुणाकडून लुटले तब्बल 54 हजार रुपये; एकास अटक.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरूण हा पेंटिंगचं एक्झिबिशन भरवणार्या एका कंपनीमध्ये मॅनेजर स्तरावर काम करत होता. दरम्यान ऑफिसच्या कामासाठी तो मार्च महिन्यात दिल्लीमध्ये दाखल होता त्यानंतर तो लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडला होता. त्यानंतर कंपनीने दिलेल्या पैशांचा वापर करून तो लॉकडाऊनच्या काळात एका लॉजमध्ये होता.
7 मे दिवशी तरूण पुण्यामध्ये परतल्यानंतर त्याला कंपनीकडून 17 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटीन राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने फोन, डेबिट कार्ड गहाण ठेवले. दरम्यान 13 जून दिवशी कंपनीच्या मालकाने दिल्लीमध्ये वापरलेल्या पैशांचा हिशोब मागत ते परत करण्यास सांगितले. त्यानंतर कारमध्ये टाकून त्याला कंपनीमध्ये आणण्यात आले.
कंपनीमध्येदेखील त्याला ओलिस ठेवण्यात आले. मालकासह दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या जननेंद्रियामध्ये सॅनिटायझर टाकल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर तरूण एका खाजगी रूग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झाला.