Pune: यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील 15 डॉक्टरांसह 10 नर्सला COVID19 ची लागण

यामध्ये 15 डॉक्टर्स आणि 10 नर्सचा समावेश असल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. राजेंद्र वाबले यांनी म्हटले आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Pune: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे काही ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच पुण्यात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याचे सध्या दिसून येत असून येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील (Yashwantrao Chavan Memorial Hospital) कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 15 डॉक्टर्स आणि 10 नर्सचा समावेश असल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. राजेंद्र वाबले  यांनी म्हटले आहे.(Mumbai: CoWIN App वर नोंदणी केल्यानंतर ताबडतोब नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन कोरोनाची लस घेऊ शकता; 59 खासगी रूग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय See List)

तर यशवंतराव चव्हाण मेमोरिय रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली ते कोविडच्या अन्य वॉर्डमधील रुग्णांना सांभाळत होते. डॉक्टरांच्या घरातील कमीत कमी 3 जणांना रुग्णालयात उचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांसह दंत विभागाचे वरिष्ठ डॉ. यशवंत इंगळे यांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत.इंगळे यांनी असे म्हटले की, कमीतकमी पाच जणांना डिस्चार्ज दिला गेला असून त्यांना होम क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. तर अजून सहा-सात जणांवर उपचार सुरु आहेत.

कोविड विभागातील डॉ. प्रवीण यांनी असे म्हटले, हे खरे आहे की रुग्णालयातील काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालय हे फक्त कोविड रुग्णांसाठीच जाहीर करावे अशी इच्छा आहे. परंतु याबद्दल वरिष्ठांकडूनच निर्णय घेतला जाईल असे डॉ. वेबल यांनी म्हटले आहे. तर रुग्णालयात 210 बेड्स हे फक्त कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अन्य पूर्णपणे भरले आहेत. तसेच 45 आयसीयू बेड्स सुद्धा रिकामे नाहीत.(धुळे: कोरोना झाल्याची भीतीपायी शिक्षकाची आत्महत्या, शिरपूर येथील धक्कादायक घटना)

दरम्यान, पिंपरी-चिंचवड मध्ये टीव्ही आणि टेलिव्हिजनवरील कमीतकमी सात पत्रकारांना गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नागरि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पत्रकार तुळशीदास शिंदे यांनी असे म्हटले की, माझ्या बायकोला प्रथम कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मला आणि मुलाला कोरोनाचे संक्रमण झाले. तर मला आणि मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे. परंतु अद्याप बायको रुग्णालयात आहे. कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.