उद्याचे हवामान पुणे: पुण्यात 24, 25 जुलै दिवशी हलक्या सरी बरसण्याचा IMD चा अंदाज

पुण्यात (Pune) 1 जुलै ते 22 जुलै सकाळी 8.30 पर्यंत 452 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या पावसाने पुण्यातील जुलै महिन्यातील पाऊस बरसण्याचा मागील 12 वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे.

पुणे हवामान अंदाज

Pune Weather Forecast:  महाराष्ट्रामध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिराने झाले आहे.  जुलै महिन्याच्या सुरूवातीला बरसलेला पाऊस मागील काही दिवस पुन्हा रेंगाळला होता पण आता राज्यात सर्वदूर पुन्हा पावसाची हजेरी दिसली आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. आज 23 जुलै दिवशी खडकवासला धरण 93.31% पेक्षा अधिक भरले असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पुणे मनपा कडून करण्यात आले आहे. पुण्यात (Pune) 1 जुलै ते 22 जुलै सकाळी 8.30 पर्यंत 452 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान या पावसाने पुण्यातील जुलै महिन्यातील पाऊस बरसण्याचा मागील 12 वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे. पुण्यामध्ये यापूर्वी जुलै 2014 मध्ये 282.4 मिलिमीटर पाऊस झाला होता. या हंगामात 1 जून पासून 516 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात अजून पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. उद्याचे हवामान महाराष्ट्र: 24 जुलै रोजी मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार मौसमी पाऊस. 

पुणे जिल्ह्यातील हवामान अंदाज घ्या जाणून

पुणे जिल्ह्यातील धरणांची स्थिती

IMD च्या अंंदाजानुसार, पुढील 6 दिवस पुण्यात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 जुलै रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

26 जुलैपासून, सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यानंतर संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत आकाश सामान्यतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी बरसण्याचा अंंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यांसह हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement