Pune Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 80 टक्के पाणीसाठा शिल्लक

मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी तब्बल 22 टक्के कमी आहे.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्याच्या घडीला 80 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी कपात ही लागू करण्यात आली होती. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात अवकाळी पावसाचे संकट)

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मिळून सध्या 158.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठी तब्बल 22 टक्के कमी आहे. पुणे जिल्ह्यातील 26 धरणांपैकी नाझरे हे धरण अद्यापही कोरडे आहे. गेल्या वर्षी यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे 102 टक्के इतके होते. पुणे जिल्ह्यात एकूण 32 धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत.

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून आज अखेरपर्यंत 26.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांचा यामध्ये समावेश आहे.