Pune Water Cut News: पुणेकरांनो लक्ष द्या, पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार जलपुरवठा
पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे. शिवाय आवश्यक प्रमाणात पाण्याचा साठाही करुन ठेवावा, असे अवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरु झाल्यावरही अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाबने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर पुण्या राहात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे शहराचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) पूर्ण एक दिवसासाठी बंद (Pune Water Cut) राहणार आहे. पुणे (Pune News) महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (27 एप्रिल) संपूर्ण पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विविध जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्थी आणि देखभालीचे काम करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे पुणे महापालिकेच्या जलविभागाने म्हटले आहे. पर्वती, छावणी, नवीन आणि जुने होळकर, भामा-आसखेड, वारजे, SNDT, चतुशृंगी, वडगाव आणि कोंढवे-धावडे या जलशुद्धीकरण केंद्रांसह इतरही अनेक ठिकाणच्या केंद्रांवरुन होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.
पाणीपुरवठा खंडीत होणारी ठिकाणे (पालिकेच्या माहितीनुसार)
पुणे शहराचा मध्यवर्ती भाग- सर्व पेठ परिसर, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन एरिया, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गाव, डायस प्लॉट, ढोले माला एरिया, सॅलिसबरी भवन, गव्हाण पार्क, गव्हाणनगर परिसर , मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पार्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गणेजेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, पुणे केनवडी परिसर, कॅनव्हाणगाव परिसर, साडेसातरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी , खराडी , वडगाव शेरी , ताडीवाला रोड , मंगळवार पेठ , मालधक्का , येरवडा , रेसकोर्स, मुळा रोड, खडकी, हरिगंगा सोसायटी, लोहेगाव, विमाननगर, कल्याणनगर, कल्याणनगर, फुगेवाडी, कळस, धानोरी, पाषाण, भुगाव रोड, बावधन, उजवीकडे व डावीकडे भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लाडकी, लांडगे. सुस रोड, रेणुकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, धनंजय सोसायटी, कोथरुड प्रादेशिक कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर, ता., रामनगर, कॅनॉल रोड, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रोड, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध.
पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे. शिवाय आवश्यक प्रमाणात पाण्याचा साठाही करुन ठेवावा, असे अवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरु झाल्यावरही अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाबने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)