Pune Traffic Police: वाहतूक पोलीसांकडून लवकरच नवी यंत्रना सज्ज, नियमांचे उल्लखन केल्यास नवीन तंत्रज्ञानाकडून कारवाई

पुणे पोलीसांनी वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच नवी यंत्रना सज्ज होणार असल्याचे सांगितले आहे.

Pune Traffic Police: वाहतूक पोलीसांकडून लवकरच नवी यंत्रना सज्ज, नियमांचे उल्लखन केल्यास नवीन तंत्रज्ञानाकडून कारवाई
traffic police (Photo credit -file)

Pune Traffic Police:  वाहतुकीचे नियम तर लहान मुलांदेखील माहित असतात पंरतु काही लोक मुद्दाम वाहतूकीचे नियम पाळत नाही. यावर पुणे पोलीसांनी उत्तम पर्याय शोधून काढला आहे. पुणे पोलीस त्यांच्या उत्तम कामगिरी मुळे नेहमी  चर्चेत राहते. काही जण पोलीसांच्या नजरा चोरत वाहतूकीचे नियम तोडतात. त्यामुळे पुणे पोलीस आता नवं तंत्रज्ञान वापरणार आहे. जेणे करून वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या लोकांवर कारवाई करता येईल.  त्यामुळे येथे पुढे वाहतूक चालवताना  नियम लक्षात राहतील.

पुणे पोलीसांनी पोलीसांच्या वाहनांवर कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कॅमेराच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा दंड भरा असे पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलीसांच्या गाडीवर बसवलेल्या कॅमेरातून वाहतुक चालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चालकांवर पोलीसांचा कडक लक्ष असणार आहे. त्यामुळे नियम मोडल्यानंतर वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 लाख 34 हजार 631 वाहनचालकांवर मागील वर्षात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतुकीचे नियमांचे पालन न केल्यास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्पात दहा शासकीय वाहनांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार आहे. गरज लागल्यास इतर वाहनांमध्ये कॅमेरे लवकरच बसवण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. रस्त्यावरिल अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2023 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).