पुणे: Tinder वरील प्रेमप्रकरण पडले महागात, प्रियकराने लावला साडे आठ लाखांचा चुना
पुण्यातील एका तरुणीचे टिंडरवर प्रेमसंबंध जुळले असता प्रियकराने तिला तब्बल साठे आठ लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.पुण्यातील एका तरुणीचे टिंडरवर प्रेमसंबंध जुळले असता प्रियकराने तिला तब्बल साडे आठ लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या ऑनलाईन डेटिंगसाठी सोशल मीडियात विविध अॅप युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक टिंडर (Tinder) असून तरुणाईमध्ये हे अॅप फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र टिंडरवर एखाद्या अनोखळी व्यक्तीची पूर्णपणे माहिती न मिळवता त्याच्या सोबत प्रेमसंबंधात अडकणे ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला पटण्यासारखी नाही आहे. मात्र तरीही काही वेळेस अनोळख्या व्यक्तीसोबत नात्यात अडकल्यानंतर काही वाईट गोष्टी घडल्याची प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक प्रकार पुणे येथे घडला आहे. पुण्यातील एका तरुणीचे टिंडरवर प्रेमसंबंध जुळले असता प्रियकराने तिला तब्बल साडे आठ लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
नितीन भंडारी असे तरुणाचे नाव आहे. सदर महिला ही 41 वर्षाची असून तिचे विविध प्रकारचे व्यवसाय आहेत. मात्र महिलेचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर तिने टिंडर वरुन तिने लग्नासाठी आपले तेथे प्रोफाइल बनवले होते. नितीन याची टिंडरवरुन या महिलेसोबत मैत्री झाली. त्यानंतर नितीन या महिलेला आपला उद्योग असून तिला भेटायला जाण्यासाठी विविध गाड्या घेऊन जात असे. या दोघांचे नाते संबंध चार वर्ष सुरु राहिले.(गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना भेटायला गेला आणि त्याला कळले की तिच्या आईसोबतच ह्याआधी केला होता 'वन नाइट स्टँड')
मात्र नात्याच्या काही वर्षानंतर नितीन याने महिलेला मी व्यवसाय अडचणीत अडकला असल्याचे सांगितले. या दरम्यान नितीन याने महिलेकडून जवळजवळ साडे आठ लाख रुपये त्याच्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतले. परंतु महिलेला भंडारी हा व्यक्ती खोटारडा असून त्याने आतापर्यंत आपल्याला फसवले असल्याचे सत्य समोर आले. त्याचसोबत भंडारी याने वेळोवेळी भेटायला येताना आणलेल्या गाड्या भाड्याच्या होत्या असे ही तिला कळले. त्यानंतर महिलेने भंडारी याच्याकडे तिच्या पैशांची मागणी केली असता तिला मारहाण करत या प्रकाराबद्दल गुपचीळी पाळण्यास सांगितले. सदर महिलेने पोलिसात धाव घेतली असून भंडारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मंगळवारी रात्री भंडारी याला अटक करण्यात आली आहे.