सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर दुपारी 2 वाजल्यानंतर जाण्यास बंदी

आता सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर (Sinhagad Fort) दुपारी 2 वाजल्यानंतर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ट्रेकर्स विविध गडांवर ट्रेकसाठी जाताना दिसून येत आहे. परंतु आता सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर (Sinhagad Fort) दुपारी 2 वाजल्यानंतर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कारण सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर प्रंचड पर्यटकांची गर्दी होत असल्याने तेथील रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येते. त्यामुळेच दुपारी 2 नंतर तेथे जाण्यासाठी बंदी घालण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

तर 14 जुलै रोजी सिंहगडाच्या येथील रस्त्यावर चक्क पाच तास वाहतुक कोंडी दिसून आली. त्यामुळे गडावरसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी बैठक घेत सुट्टीच्या दिवशी दुपारी दोन नंतर प्रवेश देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

(Mumbai Building Collapse Updates: डोंगरी मधील दुर्घटनेप्रकरणी कसून चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश)

 वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडकवासला चौपाटीवर गाडी पार्किंग करता येणार नाही असा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हातगाड्या किंवा कोणत्याही प्रकारची वाहाने उभी करता येणार नाही आहेत. त्याचसोबत खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने पाण्यात जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.