Pune Shocker: भोसरी येथे पतीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; 23 वर्षीय तरुणाला अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गर्भवती असल्याची माहिती आरोपीला होती, आरोपी तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता
पुण्यातील भोसरी येथे पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे ही महिला गर्भवती आहे. ही घटना फेब्रुवारी ते 28 एप्रिल दरम्यान मोशी भागात घडली. पीडितेने सोमवारी (19 जून) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली. अक्षय संजय कांबळे (वय 23, रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गर्भवती असल्याची माहिती आरोपीला होती, तरीही आरोपी तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376(2)(h)(n), 377, 506, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Karnataka Shocker: मुलींसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर; ABVP युनिट प्रमुखाला तीर्थहल्ली येथून अटक)
A 23-year-old man has been detained by MIDC Bhosari police for sexually assaulting a married woman while threatening to kill her husband in Bhosari. The incident happened between February 2023 and April 28 in the Moshi region.@PCcityPolice #Crime #molestation #Bhosari
.
.
Read… pic.twitter.com/qSDR0kBvhU
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 20, 2023
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2023 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

