Pune Shocker: दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात 5 दिवसांमध्ये आढळले 4 मृतदेह; पुणे जिल्ह्यात खळबळ
दौंड तालुक्यातील पारगाव (Pargaon) हद्दीत हे मृतदेह आढळून आले. ज्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सापडलेल्या एकूण चार मृतदेहांपैकी दोन पुरुषांचे तर उर्वरीत दोन महिलांचे आहेत. चारही मृतदेह साधारण 38 ते 45 या वयोगटातील आहेत.
पुणे (Pune Shocker) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात (Daund Taluka) भीमा नदीपात्रत (Bhima River) सलग पाच दिवसांमध्ये चार मृतदेह आढळून आले आहेत. दौंड तालुक्यातील पारगाव (Pargaon) हद्दीत हे मृतदेह आढळून आले. ज्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सापडलेल्या एकूण चार मृतदेहांपैकी दोन पुरुषांचे तर उर्वरीत दोन महिलांचे आहेत. चारही मृतदेह साधारण 38 ते 45 या वयोगटातील आहेत. त्यामुळे ही हत्या आहे की सामूहिक आत्महत्या? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही. ती पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. दरम्यान, हे चारही मृतदेह एकाच कुटुंबातील असावेत असाही कयास लावला जात आहे. एनडीआरएफ टीम रात्री उशीरपर्यंत शोधकार्यात व्यग्र होती.
नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहांबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, भीमा नदीपात्रात मच्छिमार मच्छिमारी करत असतात. बुधवारी (18 जानेवारी) ते नियमीतपणे मासेमारी करत असताना त्यांना पहिल्यांदा एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांध्ये (21 जानेवारी) आणखी एक मृतदेह दिसला. या घटनेत 18 जानेवारीपासून पुढच्या सलग पाच दिवसांमध्ये 4 मृतदेह आढळून आले. एकाच वेळी दररोज असे मृतदेह आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. घडल्या प्रकाराची जिल्हाभर चर्चा आहे. तर ज्या परिसरात हे मृतदेह आढळून आले त्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. (हेही वाचा, MNS leader Sameer Thigale: खळबळजनक! पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल)
पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हे मृतदेह हत्या आहे की आत्महत्या याची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यातील स्त्री पुरुष हे पती पत्नी असावेत. या मृतदेहांसोबत मुलांचाही समावेश असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण, एका महिलेच्या मृतदेहासोबत चावी आढळून आली आहे तर, आणखी एका मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती आढळून आली आहे. या पावतीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.