पुणे: अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत केला व्हिडिओ शूट, आरोपीला पोलिसांकडून अटक

पुणे येथे एका तरुणीला अ‍ॅसिडटाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने लैंगिक अत्याचार करत पीडित तरुणीचा व्हिडिओ सुद्धा शूट केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Representational Image | Rape (Photo Credits: PTI)

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील तरुणीला भररस्त्यात जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. तर सध्या पीडित तरुणी प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा पुणे येथे एका तरुणीला अ‍ॅसिडटाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने लैंगिक अत्याचार करत पीडित तरुणीचा व्हिडिओ सुद्धा शूट केल्याची बाब उघडकीस आली आहे.पीडित तरुणी कोरेगार पार्क येथील एका शाळेत शिकते.

तर आरोपी या तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत तिला त्रास देत होता. याच दरम्यान आरोपीने विद्यार्थिनीला तुझ्या घरातील व्यक्तींची हत्या करीन आणि तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकीन अशी धमकी वारंवार देत होता. त्यानंतर पीडितेवर जबरदस्ती करत तिला वाघोली परिसरात भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी सुद्धा त्याने दिली.(हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेश नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

 दिवसेंदिवस आरोपीचा त्रास वाढत असल्याने पीडित तरुणीने थेट पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर तातडीने पालकांनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. तर पोलिसांकडून 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement