Pune School Girl Harassment Case: पुण्यामध्ये शाळकरी मुलीला स्कून व्हॅन चालकाकडून अश्लील मेसेज; POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांकडे चालकाला देण्यापूर्वी त्यांनी मनसे च्या कार्यकर्त्यांनी त्याला भर रस्त्यामध्ये बदडलं आहे.

Pune MNS Workers beats School Van Driver | X

मुंबई (Mumbai) मध्ये बदलापूर (Badlapur) च्या घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी शाळकरी मुलींसोबतची प्रकरणं पुढे आली आहेत. आता पुणे मध्ये एका शाळकरी मुलीला छेडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. स्कूल व्हॅन च्या ड्रायव्हर कडून मुलीला अश्लील मेसेज आल्याचं समोर आलं आहे. इंस्टाग्राम वर हे मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्याचे काही स्क्रिन शॉर्ट्स देखील समोर आले आहेत ज्यात 'तू मला आवडते.' अशा प्रकारचे मेसेज आहेत. व्हॅन चालक मुलीला ऑनलाईन, ऑफलाईन त्रास देत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान पीडीत मुलीने तिला सतत त्रास दिला जात असल्याचं सांगितल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आहे. डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये या चालकाविरूद्ध POCSO Act अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. Mumbai: तरुणींचा छेड काढणाऱ्या युवकाला मनसेचा दणका, भररस्त्यात दिला चोप, आरोपीवर वियनभंगाचा गुन्हा दाखल .

पुण्यामध्ये स्कूल व्हॅन चालकाला बदडलं

पुण्यामध्ये मनसैनिकांनी या व्हॅन चालकाला चोपलं आहे. मनसे चे गणेश भोंकरे यांनी चालकाला घडल्या प्रकाराचा जबाब विचारला. पोलिसांकडे चालकाला देण्यापूर्वी त्यांनी मनसे च्या कार्यकर्त्यांनी त्याला भर रस्त्यामध्ये बदडलं आहे. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif