पुणे: नागरिकत्व सुधारणा कायदा, NCR आणि NPR च्या विरोधाला लोकसंगीताची जोड (Watch Video)
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीसी आणि एनपीआरच्या विरोधात जोरिरोदार आंदोलन सुरु आहेत. तसेच विविध ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण सुद्धा लागल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर पुणे मधील सारसबाग येथे ही नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीसी आणि एनपीआरच्या विरोधात संध्याकाळच्या काळोखात आंदोलन सुरु झाले आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), एनपीआर (NPR) आणि एनसीआरच्या (NCR) विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. तसेच विविध ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण सुद्धा लागल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर पुणे (Pune) मधील सारसबाग (Sarasbaug) येथे ही नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीसी आणि एनपीआरच्या विरोधात संध्याकाळच्या काळोखात आंदोलन सुरु झाले आहे. पण यामध्ये लोकसंगीताचा आधार घेत नागरिकांना त्याच्या विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये बहुसंख्यांक नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शवला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सारसबाग मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु झाले आहे. पण हे आंदोलन शांत मार्गाने सुरु असून याला लोकसंगीताची जोड देण्यात आली आहे. तर नागरिकांनी आपला काळोखात आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हातात बॅटरी घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच स्टेजवर मुस्लिम बांधवांसह एक व्यक्ती लोकसंगीतामधून सध्याच्या आंदोलनाची व्याख्या स्पष्ट करत आहे.(यवतमाळ येथे CAA,NRC आणि NPR चा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून दुकान बंदचा प्रयत्न, मालकाकडून मिर्ची पूडची उधळण Video)
ANI Tweet:
तर बुधवारी 29 जानेवारील भारत बंदच्या वेळी सुद्धा सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. भारत बंदला देशभरातून संमिश्र पद्धतीचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तर पुण्यात पोलिसांनी सारसबाग, स्वारगेट, गोळीबार मैदान, चंदन नगर आणि येरवडा येथील जवळजवळ 250 आंदोलकांना ताब्यात घेतले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)