Pune Rains: ब्रेकडाऊन झालेल्या पीएमपी बसवर झाड कोसळून बस चालकाचा मृत्यू
पुणे शहरात आज (9 ऑक्टोबर) दिवशी संध्याकाळी पुन्हा वादळी वारा आणि पावसाचा धूमाकूळ सुरू झाला आहे. सध्या परतीच्या पावसाने पुण्याला पुन्हा झोडपायला सुरूवात केली आहे. दरम्यान ग्राहक पेठ परिसरात सखल पाण्यात ब्रेकडाऊन झालेल्या एका पीएमपी बसवर झाड कोसळल्याने बसचालक गाडीत अडकून मृत्यू झाला आहे. विजय नवगुणे असं त्यांचं नाव आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पावासामुळे सखल भाग जलमय झाल्याने प्रशासनाकडून पुणे शहराला सतर्कतेचा इशारा देत प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. Pune Rains: पुण्यात तुफान पाऊस, अनेक भागांत साचले पाणी; Watch Videos
पुणे शहरात सहकार नगर, सिंहगड रोड, संतोष हॉल येथील मधुकर हॉस्पिटलजवळ पाणी साचलं आहे. तर या भागात काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. 26सप्टेंबरच्या रात्री पुणेकरांनी ढगफूटीमुळे पूरसदृश्य स्थितीचा सामना केला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यात त्यावेळेस पावसाने 23 जणांचे बळी घेतले होते.
ANI Tweet
आज पुण्यात सरस्वती मैदानावरील मनसेकडून आयोजित राज ठाकरे यांची सभादेखील रद्द करण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 12 ऑक्टोबर पर्यंत पश्चिम महराष्ट्राला वीजांचा कडकडाटासह पावसाच्या काही दमदार सरींचा सामना करावा लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांसह, शेतकर्यांनादेखील देण्यात आला आहे.