Pune Drugs Case: पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक
पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे.
Pune Drugs Case: शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं की काय? असा प्रश्न निर्माण झाला अहे. पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त( Pune Drug Case) करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स (Pune Crime News) समोर येत आहेत. अशातच पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून (Pune Crime News) जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुणांना (Pune Police) अटक केली आहे.(हेही वाचा: Women Caught Consuming Drugs In Washroom: पुण्यातील मॉलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळल्या तरुणी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर (Watch Video)
श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात (Pune Crime News) घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल एक कोटींचे 471 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. (हेही वाचा: Pune Drugs Case: अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप)
पोस्ट पहा
पुणे क्राईम ब्रांच पोलिसांची (Pune Police) ही मोठी कारवाई मानली जात आहे. एकाचवेळी कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. धक्कागायकबाब म्हणजे 30 सप्टेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयाच्या जवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन (Pune Crime News) उघड होण्यास सुरुवात झाली.
परंतु, अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेले नाही. शहरात वारंवार ड्रग्ज सापडताना दिसत आहे. ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा आणि तस्करी कोरेगाव पार्क, कल्याणीनगर त्याचबरोबर खराडीसारख्या उच्चभ्रू भागात होत असल्याने पोलिसांनी या भागावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे.