पुणे: विद्यार्थ्यांना Free Bus Passes योजना, PMC उचलणार 21 कोटीचा खर्च
पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत तर प्रायव्हेट शाळेच्या विद्यार्थ्यांना 75% सूट दिली जाणार आहे. या प्रोजेक्ट करिता पालिका 21 कोटी रूपयांची मदत करणार आहे.
पुणे महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited )बसने फिरण्यासाठी मोफत पास (Free Bus Passes ) देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पालिकेच्या शाळा आणि प्रायव्हेट शाळांचा समावेश आहे. पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत तर प्रायव्हेट शाळेच्या विद्यार्थ्यांना 75% सूट दिली जाणार आहे. या प्रोजेक्ट करिता पालिका 21 कोटी रूपयांची मदत करणार आहे. त्यासाठीची सबसिडी मंजूर करण्यात आली आहे.
गरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुणे पालिका प्रशासनाकडून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी पलिकेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास खुला केला आहे. प्रवासाच्या असुविधेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी पालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे.सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे फायदा होणार आहे.
PMPML ही वाहतुक सुविधा 2007 साली पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट यांचा एकत्र उपक्रम आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)