Pune: PMPML बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संप; पुणेकरांना नाहक मनस्ताप

गेल्या अनेक महिन्यापासून ठेकेदारांनी आपल्या थकलेल्या बिलबाबत पत्र व्यवहार करुन देखील त्यांची थकबाकी झाली नाही म्हणून ओलेक्त्रा, ट्रॅव्हल टाईम, हंसा, अँथोनी या ठेकेदारांनी संप पुकारला

PMPML BUS

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यलयात जाण्यासाठी निघणाऱ्या पुणेकरांना नाहक मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. कारण पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या चार ठेकेदारांनी अचानक संपावर गेल्याने सामान्य पुणेकर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस ठेकेदारांचे तीन महिन्यापासून बिल थकल्यामुळे 4 ठेकेदारांनी अचानक संप पुकारला. पीएमपीएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून 900 बसेस या पीएमपीएलच्या मालकीच्या आहेत. (Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना फटका)

गेल्या अनेक महिन्यापासून ठेकेदारांनी आपल्या थकलेल्या बिलबाबत पत्र व्यवहार करुन देखील त्यांची थकबाकी झाली नाही म्हणून ओलेक्त्रा, ट्रॅव्हल टाईम, हंसा, अँथोनी या ठेकेदारांनी संप पुकारला. या संपामुळे सामान्य पुणेकरांना अनेक त्रास हे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सहन करावा लागत आहे. पीएमपीएलच्या बसेस नसल्यामुळे रिक्शा आणि टॅक्सी चालक हे प्रवाशांकडून जास्त पैसे आकारत आहे.