पुणे-इंदापूर येथे विमानाचा अपघात, मोठी जीवित हानी टळली

पुणे-इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर विद्यालय जवळ मंगळवारी (5फेब्रुवारी) रोजी 12 वाजताच्या सुमारास एका शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

इंदापूर विमान अपघात (फोटो सौजन्य-प्रातिनिधीक प्रतिमा)

शेगाव: पुणे-इंदापूर (Indapur) तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर विद्यालय जवळ मंगळवारी (5फेब्रुवारी) रोजी 12 वाजताच्या सुमारास एका विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु या दुर्घटनेत मोठी जीवित हानी झाली नाही.

महाविद्यालयाजवळून दुपारी 12 वाजताच्या सुमारास बारामती जिल्ह्यात प्रशिक्षणार्थींचे एक विमान उड्डाण करत होते. मात्र अचानक विमानात तांत्रिक बिघाडामुळे 3500 फुट उंचीवरुन खाली कोसळून जमिनीवर आदळल्याने दुर्घटना घडली आहे. परंतु शिकाऊ पायलट या दुर्घटनेतून सुदैवाने बचावला असून फक्त जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी घटनास्थळी तातडीने स्थानिकांनी धाव घेत शिकाऊ पायलट सिद्धार्थ टायटस ह्याला रुई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच सिध्दार्थवर प्राथमिक उपचार केल्यानंतर बारामती येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अद्याप पोलिसांकडून या घटनेबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.