Coronavirus: पुणे, पिंपरी येथील शाळा बंद राहणार; कोरोना व्हायरस बाबतचे निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

त्यामुळे भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला असून 81 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits-ANI)

चीन मधील वुहान शहरातून लागू झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे आता जगभरात पसरले आहे. त्यामुळे भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला असून 81 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमण झालेल्यांची संख्या 17 वर पोहचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात कोरोना व्हायरस बाबत काही निर्णय घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोरोना बाबत घेतलेले निर्णय हे आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. तसेच पुणे, पिंपरी आणि चिंचवड येथील शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून आलेले रुग्ण होते. रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत.रेल्वे आणि बस सेवा बंद करणे अशक्य असून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावे. कोणत्याही कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी देण्यात येणार नाही. राज्यातील खासगी क्षेत्रातील मालकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा सुरु राहणार आहेत. तर पहिल्या ते नववी पर्यंतच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.(पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण; शहरातील बाधित रुग्णांची संख्या 10 वर)

तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणे जाण्याचे टाळावे, हस्तांदोलन नको किंवा वारंवार हात धुणे हे उपाय करावे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई नागपूर येथील मॉल, नाट्यगृह, स्विमिंग पूल आणि जिम बंद ठेवण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच मॉल आणि सिनेमागृहात जाणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.