राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक, पिंपरी चिंचवड येथून महापालिकेच्या नगरसेवकाने सोडले पद
तर पवार यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच महाराष्ट्राच्या राजकरणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) मोठी खळबळ उडाली असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर पवार यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच महाराष्ट्राच्या राजकरणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) मोठी खळबळ उडाली असल्याचे दिसून आले. याच पार्श्वभुमीवर आता राष्ट्रवादीचे कार्यक्रत्यांनी पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पक्षातील समर्थकांनी आक्रमक होऊन आता राजीनामा देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. तर पिंपरी चिंचवड मधील महापालिकेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवक जावेद शेख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
जावेद शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असे म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेल्या सुडाच्या राजकाराणाचा आता कंटाळा आला आहे. त्यामुळेच आपण राजीनामा दिली असल्याचे विधान शेख यांनी केले. तर अजित पवार यांचे समर्थन करण्यासाठी आता अन्य पक्षातील नेतेमंडळी सुद्धा राजीनामा देण्यासाठी पुढे येत आहेत.(अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले...)
तर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून त्याबाबत विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. तसेच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अजित पवार यांचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादीत मोठा भुकंप झाल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र पवार यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आमदारकीचा राजीनामा दिला आहे हे स्पष्ट झालेले नाही. तसेच प्रसारमाध्यमांकडून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता अजित पवार नेमके कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी असे म्हटले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला जराही कल्पना नव्हती. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर माझ्याशी चर्चा केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कुणाशीच संपर्क साधला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून मी या विषयात नक्की लक्ष घालणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.