Ola-Uber Auto Service In Pune: पुण्यात ओला आणि उबेरच्या रिक्षा सर्विसला लागणार ब्रेक

आरटीओने परवाना नाकारल्याने पुण्यामध्ये ओला आणि उबेरची रिक्षा सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

Ola, Uber | Twitter

Ola-Uber Auto Service In Pune: आरटीओने परवाना नाकारल्याने पुण्यामध्ये (Pune) ओला (Ola) आणि उबेरची (Uber) रिक्षा सेवा बंद होण्याची शक्यता आहे.ओला, उबेरमार्फत दिल्या जाणाऱ्या चारचाकी कॅब सेवेला हिरवा कंदील, तर रिक्षा सेवेला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. चारचाकी, तीनचाकी वाहनांमधून ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबरसह इतर कंपन्यांना ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी सहा मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे. त्यानंतर 20 एप्रिलपर्यंत ‘ऍग्रीगेटर’ परवान्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला दिले होते.

पुण्यासह राज्यातील विविध शहरांत ऑनलाइन प्रवासी सेवा देण्यासाठी आणि ‘ऍग्रीगेटर’ परवान्यासाठी ओला, उबरसह इतर कंपन्यांनी अर्ज केले होते. पुणे ‘आरटीओ’कडे ओला, उबेर, रॅपीडोसह शहरातील एका कंपनीने अर्ज केला होता. यामध्ये ओला व उबरने तीन चाकी व चारचाकीसाठी अर्ज केला आहे, तर इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. यानंतर ओला, उबेरच्या हलक्या कारद्वारे प्रवासी सेवेला परवाना देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. तर, रिक्षा सेवेसाठीच्या चारही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.  यामुळे आता पुणे शहरात ओला आणि उबेर सर्विसच्या तीन चाकी वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.