Pune News: शेततळ्यात बुडून बापलेकांचा मृत्यू, चिमुकल्याला वाचवताना वडिलांचेही निधन

तो बुडत असल्याचे पाहून जवळच असलेल्या बापाचे हृदय द्रावले. चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापानेही पाण्यात उडी घेतली. पण, दुर्दैव असे की, बापाला पोहता येत नव्हते. चिमुकल्याला पोहता येण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी चिमुकला आणि बाप असे दोघेही पाण्यात बुडाले. ज्यामुळे त्यांचा करुण अंत झाला.

Drown | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

शेततळ्यात (Shettale) पडलेल्या चिमुकल्याला वाचवताना बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर (Shirur Taluka) तालुक्यात असलेल्या पंचतळे परिसरात घडली. शेततळ्याशेजारी खेळता खेळता चिमुकला शेततळ्यात पडला. तो बुडत असल्याचे पाहून जवळच असलेल्या बापाचे हृदय द्रावले. चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापानेही पाण्यात उडी घेतली. पण, दुर्दैव असे की, बापाला पोहता येत नव्हते. चिमुकल्याला पोहता येण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी चिमुकला आणि बाप असे दोघेही पाण्यात बुडाले. ज्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. दरम्यान, नवऱ्याला मुलासह पाण्यात बुडताना पाहून पत्नीला धक्का बसला. तिनेही या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तिलाही पोहता येत नव्हते. तिसुद्धा बुडू लागली. परंत, तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि महिलेचे प्राण वाचवले.

सत्यवान शिवाजी गाजरे (वय 25) आणि राजवंश गाजरे (वय अवघे दीड वर्षे) अशी पितापुत्रांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे 20 फूट खोल शेततळे आहे. जे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आणि मंगल कार्यालय यांच्या पाठिमागील बाजूस आहे. या कृषी पर्यटन केंद्रातच फेरफटका मारण्यासाठी सत्नवान गाजरे हे आपली पत्नी आणि चिमुकल्यासह सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आले होते. दरम्यान, आई वडिलांची नजर चुकवून दीड वर्षाचा चिमुकला राजवंश दुडुदुडू चालत शेततळ्याजवळ गेला आणि पाण्यात पडला.

मुलाला पाण्यात पडल्याचे पाहताच बापानेही पाण्यात उडी घेतली आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, बापालाही पोहता येत नसल्यान दोघांचाही बुडून करुण अंत झाला. पत्नी स्नेहलने आरडाओरडा करत मदतीची याचना केली आणि तिनेही पाण्यात उडील मारली. परंतू, तिलाही पोहता येत नसल्याने तिसुद्धा बुडत होती. मात्र, आरडाओरडा ऐकून सत्यवान यांचे बंधू किरण गाजरे, प्रवीण गाजरे आणि हॉटेलमधील कामगारांनी तळ्याकडे धाव घेत मदत आणि बचाव कार्य राबवले. ज्यात पत्नी स्नेहल हिचे प्राण वाचविण्यात यश आले.