Pune Murder Case: जन्मदात्या आईचा खून, पुणे हादरलं, आरोपीला शिर्डीतून अटक

एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pune Murder Case: पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काल पैश्यावरून मित्रावर गोळीबार करून आरोपीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना पुणे शहरातील खडकी येथील आहे. आरोपी मुलाने घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून खून केल्याचे समोर आले आहे. खून करून आरोपी फरार झाला होता, पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

भेटायला गेल्यानंतर खून

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आईचा कोयत्याने गळा कापून खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. गुंफाबाई शंकर पवार असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही अहमदनगर येथे राहत होती. तर ज्ञानेश्वर पवार असं आरोपी मुलाचे नाव आहे. तो पुण्यातील खडकी येथे राहायचा. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाचा शोध घेत त्याला शिर्डीतून अटक केली आहे. शनिवारी मुलाला भेटायचं म्हणून पुण्यात आला. काही महिन्यापूर्वीच त्याचा घटस्फोट झाला होता म्हणून तो एकटाच राहायचा. घटस्फोट आईमुळे झाला असा संशय नेहमी त्याचा मनात राहायचा. याच गोष्टीचा राग करत त्याने आईला संपवले.( हेही वाचा- दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या,)

आरोपी ताब्यात

आई मध्यरात्री झोपेत असताना कोयत्याने गळा कापून खून केला. त्यानंतर आरोपी घरातून फरार झाला. कुलुप लावून घरातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी तिच्या मृत्यू माहिती सर्वाना मिळाली. नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईल वर कॉल केला होता परंतु फोन  कोणीच उचलला नाही त्यामुळे संशय आला. दुसऱ्या मुलाला या घटनेची माहिती दिली, दुसरा मुलगा हा डेहराडून येथून खडक येथे गेला. तर आईचा खून झाल्याचे त्याला समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी चक्र फिरवत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आणि आईचा मृतदेह आणि कोयता ताब्यात घेतला.