पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची 3 महिन्यात बदली; विक्रमकुमार असणार नवे महापालिका आयुक्त
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे (Pune Metropolitan Region Development Authority) सीईओ विक्रम कुमार (Vikram Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांची अवघ्या तीन महिन्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आज पुण्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची पुन्हा एकदा साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या ओएसडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा - गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन)
विक्रम कुमार हे यापूर्वी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. परंतु, त्यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि मंचर उपविभागाचे सहायक आुयक्त जितेंद्र दुदी यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या बदल्यांमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2020 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).