पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह, प्रकृती स्थिर असल्याची ट्वीटच्या माध्यमातून दिली माहिती

परंतु मुरलीधर मोहोळ यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्या घराबाहेर पडताना पूर्वीपेक्षा आता अधिक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सामान्य व्यक्तीपासून ते आता राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी समोर आली आहे. परंतु मुरलीधर मोहोळ यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.(COVID 19 लस बाबत ICMR चा दावा अवास्तव, नामुष्की टाळण्यासाठी आणि लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यासाठी आटापिटा आहे का? पृथ्वीराज चव्हण यांचा सवाल)

मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, थोडासा ताप आल्याने कोविड19 ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. परंतु प्रकृती स्थिर असून लवकरच तुमच्या सेवेत हजर होणार असल्याचे ही मोहोळ यांनी म्हटले आहे. परंतु कोरोनाची लागण झाली असली तरीही उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहे.(मुंबई: धारावीत आज कोरोनाच्या दोन रुग्णांची भर तर 2 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 2311 वर पोहचला)

यापुर्वी, धननंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र या सर्वांनी कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेत कार्यरत झाले आहेत. कोरोनाची परिस्थितीसह आता पावसाळ्याचे दिवस सुद्धा सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी. पुण्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 25454 वर पोहचला असून 826 जणांचा बळी गेला आहे. तसेच 12218 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.