PM Narendra Modi यांनी उद्घाटन केलेल्या पुणे मनपा परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग तुटला; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
विद्युत रोषणाईच्या वेळी मेघडंबरीला धक्का लागल्याने ही दुर्घटना झाल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुणे मनपाच्या आवारामध्ये रविवार 6 मार्च दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. मात्र नंतर दुसर्याच दिवशी या पुतळ्यातील मेघडंबरीचा एक भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी यावर स्पष्टीकरण देत विद्युत रोषणाईच्या वेळी मेघडंबरीला धक्का लागल्याने ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. यावरून सुरू असलेले एनसीपीचं राजकारण त्यांनी थांबवावं. त्यांच्याकडून गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोपही मोहोळ यांनी केले आहेत.
काल रात्री महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबूक लाईव्ह द्वारा भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ देखील दाखवत मेघडंबरीला धक्का लागल्याचं दाखवलं आहे. दरम्यान काँग्रेस, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप केला होता. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे देखील नक्की वाचा: Ajit Pawar यांचा PM Narendra Modi यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं थेट नाव न घेता जाहीर सभेत निशाणा .
महापौर मुरलीधर मोहोळ फेसबूक लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुणे शहरातील पहिला सिंहासनाधीश पुतळा आहे. पुणे मनपा ने स्वखर्चातून त्याची स्थापना केली आहे. सहा महिन्यात हा पुतळा 2 टन ब्रॉंझ वापरून साकारण्यात आला आहे.