Pune: नवरा WhatsApp वर Dp ठेवत नाही म्हणून उच्चशिक्षित महिलेची पोलिसात धाव
परंतु दोघांनी जर एकमेकांना समजून घेतल्यास नाते दीर्घकाळ टिकते असे ही म्हटले जाते. परंतु सध्या सोशल मीडियावरील इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमुळे एका विवाहित जोडप्यात जोरदार भांडण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune: नवरा बायको मध्ये लहानसहान गोष्टीवरुन भांडण होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु दोघांनी जर एकमेकांना समजून घेतल्यास नाते दीर्घकाळ टिकते असे ही म्हटले जाते. परंतु सध्या सोशल मीडियावरील इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमुळे एका विवाहित जोडप्यात जोरदार भांडण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट ऐवढ्यावर थांबली नाही तर बायकोने चक्क पोलीस स्थानकच गाठले आहे. सदर दांपत्य हे पुण्यात राहणारे असून नवरा आपला फोटो व्हॉट्सअॅपवर डिपी ठेवत नाही म्हणून उच्चशिक्षित महिलेने पोलिसात धाव घेत त्या बद्दल तक्रार दाखल केली आहे.(Police Patil: पोलीस पाटील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कलम 353 अन्वये संरक्षित, राज्य सरकारचा निर्णय)
महिला जेव्हा पोलीस स्थानकात पोहचली त्यावेळी तिला कौंटुबिंक विभागात समस्यांचे निराकरण करण्यात येते तेथे पाठवले गेले. त्यावेळी महिलेने नवरा तिच्यासह तिच्या माहेरच्या लोकांची सुद्धा योग्य प्रकारे काळजी घेतो. तसेच त्या दोघांमध्ये सुद्धा कधीच कोणत्याच कारणावरुन भांडण होत नाही. मात्र पोलीस तक्रार करण्यापर्यंत जी गोष्ट घडली ती म्हणजे नवरा व्हॉट्सअॅपला माझा डिपी का ठेवत नाही यावरुन झाले आहे.(Murbad Molestation Case: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक नितीन तेलवाने यांना अटक)
यावर समुपदेशाच्या वेळी महिलेला समज देत असे सांगण्यात आले की, नवरा जर तुझ्या माहेरच्या लोकांसह तुझी सुद्धा काळजी घेतो तर ही किती मोठी गोष्ट आहे. तसेच त्यांचे तुमच्यावर खुप प्रेम सुद्ध आहे. परंतु प्रेम हे दाखवण्यासाठी नव्हे तर आपल्या वागण्यातून व्यक्त केले जाते असे महिलेला सांगण्यात आले. त्यावर महिलेला आपली चुक लक्षात येत दोघांमध्ये पुन्हा आधीसारखे बोलणे सुरु झाले.