पुण्यात हापुस आंब्यांची एन्ट्री, बाजारात 25 हजारांना विकली जातेय पेटी
कारण पुण्यातील बाजार पेठांमध्ये हापुस आंब्यांनी एन्ट्री केली असून यंदाची कोरोनाची परिस्थिती आणि अन्य समस्या पाहता त्याची किंमत ऐकून तुम्ही जरा हैराण व्हाल.
महाराष्ट्रात हापुस आंब्यांची एन्ट्री झाली असून नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण पुण्यातील बाजार पेठांमध्ये हापुस आंब्यांनी एन्ट्री केली असून यंदाची कोरोनाची परिस्थिती आणि अन्य समस्या पाहता त्याची किंमत ऐकून तुम्ही जरा हैराण व्हाल. त्यामुळे जर तुम्हाला आंब्याची पेटी खरेदी करायची असेल तर त्यासाठी 25 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.(PM Kisan Maan Dhan Scheme: वयाच्या साठी नंतर शेतकर्यांना प्रतिवर्षी 36,000 कमावण्याची संधी; पहा काय आहे योजना)
पुण्यात हापुस आंब्याच्या एका पेटीची किंमत 25 हजार रुपये ठेवली गेली आहे. गेल्या वर्षात हिच किंमत 21 हजार रुपये होती. दरम्यान महाराष्ट्रात हापुस आंब्यांच्या प्रेमींसाठी ही किंमत तितकीशी महत्वाची मानली जात नाही. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे आंब्याच्या पेटींची किंमत अधिक वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 15 दिवस आधिच आंबा बाजार पेठेत दाखल झाला आहे. नामदेव चंद्र भोसले आणि त्यांचा मुलगा यांना ही पहिली हापुस आंब्याचा माल मिळाला आहे. हा आंबा देवगढ येथील एका व्यापाऱ्याने पाठवला आहे.(महाराष्ट्र: दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील 125 कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त)
हापुस आंब्याची पहिली खेप व्यापारासाठी शुभ मानली जाते. ऐवढेच नाही तर बाजार पेठेचे अध्यक्षांकडून आंब्याच्या पहिल्या मालाची पूजा सुद्धा केली जाते. यंदा याची पूजा बाजार पेठेच्या समितीमधील काही सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. सध्या आंब्याची आवक बाजारात पूर्णपणे सुरु झालेली नाही. पण दुकानदारांना अपेक्षा आहे की, लवकरच बाजारात हापुस आंब्याची आवक सुरु होईल.