Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari यांनी पुण्यात एका भर कार्यक्रमात फोटोसेशन दरम्यान महिला सायकलपटू चा मास्क खेचला
कोविडचा वाढता धोका पाहता सरकारकडून, आरोग्य यंत्रणांकडून कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असताना राज्यपालांनी भर कार्यक्रमात एका महिलेच्या चेहऱ्यावरील मास्क हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) मागील काही दिवसांपासून अनेक गोष्टींमुळे चर्चेमध्ये आहेत. आता त्यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. काल (17 सप्टेंबर) पुण्यात (Pune) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बर्थ डे (PM Narendra Modi Birthday) निमित्त एका कार्यक्रमामध्ये महिला सायकलपटूचा सत्कार केल्यानंतर त्यांनी फोटोसेशच्या वेळेस तिचा मास्क तोंडावरून खाली खेचला. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ वायरल होत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बर्थ डे निमित्त कोथरूड मध्ये सायकल रॅली कार्यक्रमासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ही सायकल रॅली झाली. राज्यपालांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी एका महिला सायकलपटूचा सत्कारही केला. पण नंतर फोटोसेशनला उभं असताना त्यांनी स्वतः मास्क खाली खेचला.
दरम्यान अजित पवारांनी या घटनेवर तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यपाल महामहीम असतात. त्यांच्या कृतीवर आम्ही टीपण्णी करू शकत नाही. राज्यपालांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला तर आम्हालाही मास्क काढावा लागतो.'
कोविडचा वाढता धोका पाहता सरकारकडून, आरोग्य यंत्रणांकडून कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असताना राज्यपालांनी भर कार्यक्रमात एका महिलेच्या चेहऱ्यावरील मास्क हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.