Pune Loksabha Bypoll: पुणे लोकसभा पोटनिवडणूक; इच्छुकांच्या बहुगर्दीत भाजपच्या मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, बापट स्नुषेचेही नाव; राष्ट्रवादीतही लॉबिंग सुरु
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) लागण्याची शक्यता आहे. संभाव्य पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांतून इच्छुकांची बहुगर्दी आहे. परंतू, कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे इथेही 'वनटूवन' अशी भाजप विरुद्ध मविआ सामना होण्याची शक्यता आहे. असा सामना झाला तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र दिसू शकते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. यात भाजपमध्ये माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट (Swarda Bapat) यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर अवघे काही तास उलटण्याच्या आगोदरच पुण्याचा भावी खासदार म्हणून पोस्टर्स झळकले होते. हे पोस्टर्स भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याणीनगर परिसरात लागले होते. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही पोस्टर पुण्याचे 'भावी खासदार' असा उल्लेख करत पक्ष कार्यालयासमोर लागले होते. त्यामुळे पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतो याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Ajit Pawar Poster Pune: 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री', अजित पवार यांचे नाव आणि फोटो वापरुन झळकले पोस्टर; घड्याळ मात्र गायब)
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घेऊन दिलेल्या वृत्तात महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनने दिलेल्या वृत्तात त्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणूक 2019 च्या वेळी आपण चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मतदारसंघ सोडला. पण, पक्षाने पुन्हा संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.