Pune Local Megablock: पुणे ते लोणावळा लोकल दरम्यान मेगाब्लॉक, काही लोकल रद्द तर काही एक्सप्रेस गाड्या कॅन्सल
पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील (Pune Department) पुणे-लोणावळा (Pune Lonavala) उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत आणि का ही एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात येणार आहे. पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहणार आहे. तर पुण्याहून लोणावळ्यासाठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.पुण्याहून लोणावळ्यासाठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहणार आहे. (हेही वाचा - Heavy Vehicle Ban On Shilphata Road: शिळफाटा मार्गांवर अवजड वाहनांना दिवसा बंदी, ठाणे-नवी मुंबईतील वाहतूक कोंडी वाढणार?)
शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
पुण्याहून लोणावळ्या करीता 16.25वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील. पुण्याहून लोणावळ्यासाठी 18.02 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01572 रद्द राहील.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 19.35 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01571रद्द राहील.
गाडी क्रमांक 121164 एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)