Khadakwasla Dam Water: पुणे शहरात पाण्याची स्थिती गंभीर, गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी कमी

त्या बैठकीत पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात येणार आहे.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

पुणे शहरात (Pune City) पाण्याची स्थिती फारच बिकट होत चालली आहे,  गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीत आजच्या दिवशी 20.26 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. आज तो 17.29 टीएमसी (TMC) एवढा आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी विचारात घेता पुढील पाच महिन्यांचे काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागासह पालिकेला करावे लागणार आहे. तसेच पुण्यातील नागरिकांनाही पाण्याचा वापर हा जपून करावा लागणार आहे. अद्याप पुण्यात कोणतीही पाण्याची कपात लागू करण्यात आली नसून भविष्यात मात्र ही कपात लागू होऊ शकते.  (हेही वाचा - Water Cut In Pune: पुण्यात 8, 9 फेब्रुवारी दिवशी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; पाणी सांभाळून वापरण्याच्या पालिकेच्या सूचना)

या महिन्यात कालवा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असून पुणे शहरात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत थोडीशी बिकट आहे. या बैठकीत पाण्याची कपात लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.

पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याला प्राधान्य असेल. त्यानंतरच शिल्लक राहिलेले पाणी हे शेतीला देण्याचे काम करा, अशा सूचना ही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. परंतु गेल्या काही महिन्यांत धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन वेळीच करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच कालवा समितीची बैठक घेण्याचे नियोजन आहे.