Pune: पुणे येथे शौचालयाच्या टाकीत पडलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, हे चारही जण टाकी साफ करण्याचे काम करत होते. या वेळी ते टाकीत पडले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनासथळी रवाना झाल्या.

Pune: पुणे येथे शौचालयाच्या टाकीत पडलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू
Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

शौचालयाच्या टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, हे चारही जण टाकी साफ करण्याचे काम करत होते. या वेळी ते टाकीत पडले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनासथळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी या चौघांना बाहेर कारण्याचा प्रयत्न केला. मात्र, टाकीतील विषारी वायुमुळे गुदमरुन चौघाचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, सिकंदर पोपट कसबे,पद्माकर मारुती वाघमारे,कृष्णा दत्ता जाधव आणि रुपेश कांबळे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण लोणी काळभोर येथील प्यासा हॉटेल मागे असलेल्या जय मल्हार कृपा इमारतीत शौचालयाच्या टाकीचे काम करत होते. टाकीचा उपसा करताना चौघांतील एकजण टाकीत पडला. त्याला वाचविण्यासाठी तिघेही धावले. मात्र, याच वेळी हे तिघेही टाकीत पडले. (हेही वाचा, Aurangabad: कारमध्ये स्फोट, जोडप्याचा होरपळून जागीच मृत्यू; औरंगाबाद येथील घटना)

दरम्यान, चौघांनाही टाकीतून बाहेर काढले मात्र तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. बेशुद्धावस्थेत असतानाच या चौघानाही दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच चौघांचाही गुदमरुन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती लोणी काळभोर पोलीसांनी प्रसारमाध्यमांना दिली. घडल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2022 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).