पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेज उद्या बंद, पावसामुळे शासकीय सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यातरील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या ही सुट्टी असणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे.
गेले दोन दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे तो वाहतुक व्यवस्थेवर. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक याठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पाठोपाठ पुणे जिल्ह्यातही उद्या (5 ऑगस्ट) रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या ही सुट्टी असणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे.
दिनांक 4 ते 6 दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून सुरु झालेल्या पावसाचे थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाळा व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याबाबतचा आदेश देखील काढला आहे. (हेही वाचा: पुणे शहरात पावसाने धोक्याची पातळी ओलांडली; 500 कुटुंबांचे स्थलांतर, मुठा नदीला पूर)
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातही पूरस्थितीमुळे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 500 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पानशेत आणि खडकवासला धरण पूर्णतः भरले असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.