Pune: पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, डोंगरकड्यांवर ट्रेकिंगला परवानगी; काय आहेत अटी? घ्या जाणून
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आढळून आले होते. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात गिर्यारोहण (Climbing) आणि ट्रेकिंगवर (Trekking) बंदी घालण्यात आली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात गिर्यारोहण (Climbing) आणि ट्रेकिंगवरही (Trekking) बंदी घालण्यात आली होती. परंतु, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून टप्प्याटप्याने बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मिशेन बिगेन अंतर्गत पुणे जिल्हा प्रशासनाकडून गड किल्ले, काताळकडे याठिकाणी गिर्यारोहण आणि ट्रेकिंगला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली आहे.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही गिर्यारोहणातील शासनमान्य शिखर संस्था असून गेली 31 वर्ष गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या वृद्धीसाठी अविरतपणे काम करत आहे. ज्याप्रमाणे धरण परिसरातील पर्यटन निबंध हटविण्यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यासंबंधी प्रशासनाची परवानगी प्रकाशीत केल्या साहसवीरांना हुरुप येईल. गिर्यारोहण व साहासाच माहेघर पुन्हा एकदा खुलेल, अशी विनंती या कार्यालयाकडे केलेली आहे. त्यास अनुसरुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित पुणे जिल्ह्यातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण आणि ट्रेकिंग साठी परवानगणी देण्यात आली आहे, असे महोळ म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Child Adoptions: गेल्या एका वर्षात दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये मुलींची संख्या जास्त; अॅडॉप्शनच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अव्वल
मुरलीधर महोळ यांचे ट्वीट-
महत्वाचे म्हणजे, ट्रॅकिंगच्या एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा जास्त जण नसावेत. तसेच ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. जर अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करण्यात यावे. ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे.