पुणे: 17 वर्षापूर्वी दोन मित्रांनी केलेल्या हत्येचे गूढ उकलले, या वर्षी करण्यात आले सांगाड्यावर अंत्यसंस्कार

त्यावेळी पैशाच्या वाटणीवरुन मुलाचे त्याच्या मित्रांसोबत वाद झाल्याने त्याची हत्या करण्यात आली होती.

प्रतीकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये एका मुलाची त्याच्या दोन मित्रांनी हत्या केली होती. त्यावेळी पैशाच्या वाटणीवरुन मुलाचे त्याच्या मित्रांसोबत वाद झाल्याने त्याची हत्या करण्यात आली होती. मात्र 2006 रोजी या प्रकरणातील आरोपींना निर्षोद म्हणून सोडण्यात आले होते.

या प्रकरणाचा छडा काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) कोथरुमध्ये असलेल्या पोलीस स्थानकात पहिल्या मजल्यावरील खोली साफ करताना एक बॉक्स सापडून आले. त्या खोक्यावर मानवी सांगाडा असल्याचे लिहिले होते. परंतु तेथील पोलिसांनी हा बॉक्स उघडून पाहिल्यास त्यामध्ये चक्क मानवी सांगाडा कूजलेल्या स्वरुपात असल्याचे दिसले. त्यानंतर बॉक्सवर असलेल्या माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिसांकडे देत त्याचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासणी दरम्यान बॉक्स मधील सांगाडा हा 17 वर्षांपूर्वी हत्या झालेल्या मुलाचा असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

(सांगली मध्ये बाजारात विकली जातायत प्लास्टिकची अंडी? खरेदी करण्यापूर्वी घ्या अशी खबरदारी)

दरम्यान सांगाडा सापडेल्या मुलाच्या घरातील मंडळींचा शोध घेत पोलिसांनी त्यांना सुद्धा माहिती दिली. तर मुलाच्या वडिलांनी त्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले. परंतु अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या घटनास्थळी उपस्थित राहू असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 17 वर्षे कुजूत पडलेल्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.