Pune Daund Accident VIDEO: क्षणात मृत्यू; पुणे येथील दौंड परिसरातील थरारक घटना CCTVत कैद
ही कंपनी दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात आहे.
आयुष्य म्हणजे काय? तर 'दोन श्वासांमधलं अंतर' असं अनेकांनी म्हणून ठेवलं आहे. याचीच प्रतिती देणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात असलेल्या खामगाव (Khamgaon) येथील एका कंपनी आवारात घडली आहे. येथील अनमोल अॅग्रो इंडस्ट्रीज (Anmol Agro Industries) नावाच्या कंपनीमध्ये दोन कामगार दोन ट्रकच्या मध्ये चिरडले. त्यातील एक जण जीवाला हाकनाक मुकला आहे. सदर कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेचा थरारक व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. वाचकांसाठी सूचना अशी की, हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.
कामगाराचा चिरडून मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, घटनेत मृत्यू झालेला कामगार हा पुणे येथील अनमोल अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीत कामाला होता. सायंकाळची वेळ असल्याने कामगार काहीसे निवांत होते. त्यातील दोन कामगार कंपनीच्या पार्किंग आवारातून निघाले होते. दरम्यान, हे दोघे जण एका उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठिमागून जात होते. त्याच वेळी दुसरा एक ट्रकचालक त्याचे वाहन (ट्रक) उभ्या असलेल्या वाहनाच्या पाठिमागे पार्क करण्याच्या विचारात होता किंवा तिथून तो दुसरीकडे वळवत होता. त्याने त्याचे वाहन उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठिमागे उभे केले. इतक्यात दोन कामगार या दोन्ही ट्रकच्या मधून पुढे निघाले होते. इतक्यात घात झाला. समोर उभा असलेला ट्रक अचानक पाठिमागे आला. ज्यामुळे हे दोन्ही कामगार दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडले. ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्याचा जीव आश्चर्यकारकरित्या वाचला. (हेही वाचा, Pune Accident Video: वाघोली-लोहेगाव रोडवर सिमेंटच्या भरधाव वाहनाची स्कूल बसला धडक, पाहा व्हिडीओ)
दौंड पोलिसांकडून घटनेची नोंद
घटना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. ज्यामुळे या अपघाताचा व्हिडिओ तयार झाला आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील कंपनीतील तीन कामगार कंपनीच्या पार्किंग परिसरातून पायी निघाले होते. त्याच वेळी एक ट्रक चालक आपले वाहन बाजूला घेत होता. वाहन बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याने त्याचे वाहन दुसऱ्या एका उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठिमागे घेतले. दरम्यान, पायी जाणारे कामगार या दोन्ही वाहनांच्या मधून निघाले होते. याच वेळी उभा असलेला ट्रक अचानक मागे सरकल्याने दोन्ही ट्रकच्या मध्ये आला. ज्यामुळे तो चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, कायदेशीर कार्यवाही सुरु केली आहे. (हेही वाचा, Hyderabad BMW Crash: आलिशान कारची दुभाजकाला धडक, दोघे जण गंभीर जखमी, हैद्राबाद येथील घटना)
सावधान! हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलीत करु शकतो
दरम्यान, सदर घटनेमुळे अनमोल अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीमधील कामगार आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. कामगार भीतीच्या सावटाखाली आहेत. कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची योग्य ती घबरदारी घेतली होती की नाही याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.