Pune Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणांच्या पाण्यामध्ये मोठी वाढ
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार महत्त्वाच्या धरणांमध्ये सध्या 47.37 टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
पुण्यात (Pune) गेल्याकाही जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशीरा झाल्याने धरणातील पाणी कमी झाल्याने शहरात पाणी कपात देखील लागू करण्यात आली होती. गेले दोन-तीन दिवस शहर आजूबाजूच्या परिसरात पडत असलेल्या पावसामुळे येणाऱ्या काही पुणेकरांचा पाणीप्रश्न मिटणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण साखळीत काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या 24 तासात सुमारे एक टीएमसी पाणी जमा झालेले आहे. तर पानशेत धरणात 50 टक्के म्हणजे 5.34 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. (हेही वाचा - Maharashtra weather Update: आजही राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' भागांना हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट)
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार महत्त्वाच्या धरणांमध्ये सध्या 47.37 टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. खडकवासला धरणात 60.26 टक्के, पानशेत धरणार 50.14 टक्के, वरसगाव धरणात 47.73 टक्के, टेमघर धरणात 31.31 टक्के इतका पाणीसाठा हा उपलब्ध आहे. चार धरणातील एकूण क्षमता ही 29.15 टीएमसी इतका पाणी साठा हा उपलब्ध झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भिमाशंकरच्या परिसरात पाऊसाची संततधार कायम सुरु आहे. मात्र अजूनही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊसाची प्रतिक्षाच आहे. कुकडी प्रकल्पातील पाच आणि भिमा भामा खोऱ्यातील दोन धरणांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. सह्याद्री कुशीतल्या घाटमाथ्यावर पाऊसाची संततधार सुरु असली तरी धरणाच्या पाणी साठ्यात येणारे पाणी अत्यल्प असल्याने पाणी पातळी वाढत नाही.