Pune Crime News: लोखंडी रॉडने पुणे येथे तीन लहान बहिणींवर हल्ला; क्रिकेटच्या वादातून मावस भावाचे कृत्य

या हल्ल्यात तीनही मुली गंभीरजखमी झाल्या आहेत. ही घटना (Pune Crime News) वारजे परिसरात घडली. या प्रकरणी कृष्णा सहानी यांनी दिलेल्या तक्रारीवरु वारजे (Warje Malwadi Police Station) पोलिसांनी रामनाथ सहानी, राम सहानी आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे (Pune) येथे एका युवकाने तीन लहान मुलींवर लोखंडी रॉडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीनही मुली गंभीरजखमी झाल्या आहेत. ही घटना (Pune Crime News) वारजे परिसरात घडली. या प्रकरणी कृष्णा सहानी यांनी दिलेल्या तक्रारीवरु वारजे (Warje Malwadi Police Station) पोलिसांनी रामनाथ सहानी, राम सहानी आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे हल्ल्यात जखमी झालेल्या तीनही मुली आरोपींच्या मावस बहिणी आहेत. सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.

घटनेबद्दल माहिती अशी की, वारजे परिसरातील दांगड वस्ती येथे फिर्यादी आणि आरोपी यांच्यात क्रिकेट खेळण्यावरुन शनिवारी रात्री 8.30 वाजणेच्या सुमारास वाद झाला होता. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीला मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. या वेळी फिर्यादी व्यक्ती आरोपीला घरात आढळून आली नाही. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने फिर्यादीच्या कुटुंबातील महिला आणि मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात तीन मुली गंभीर जखमी झाल्या. तीन्ही मुली आरोपीच्या मावस बहिणी आहेत. (हेही वाचा, Crime Against Women: महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशात देशातील अर्धी प्रकरणे, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती)

आरोपीसोबत रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारही होते. पाच आरोपींनी फिर्यादी कृष्णा याची आई आणि तीन लहान बहिणींवर हल्ला केला. आरोपींनी केलेला हल्ला इतका तीव्र होता की, तीन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारजे पोलीस ठाण्यात या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. कोयता गँगने तर संपूर्ण शहरात दहशत माजवली आहे. त्यानंतर व्यक्तीगत स्वरुपांच्या हल्ल्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे समाजातील सर्वत स्तरातील नागरिकांना अनोखी भीती आणि मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात कारवाई करावी, अशी मागण आता होऊ लागली आहे.