Pune Murder Case: पुण्यात आयटी कंपनीत काम करणारा बेपत्ता तरुणाचा कुजलेला अवस्थेत मृतदेह सापडला; मारेकरू अटकेत

९ दिवसांनी अचानाक त्याचा मृतदेह सापडतो.त्यामुळे परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Pune Murder Case: पुण्यातील  नुकताच आयटी कंपनीत काम करणारा एक तरुण 28 जुलै रोजी बेपत्ता (Missing) होतो. आणि अवघ्या नऊ दिवसांनी त्याचा मृतदेह (Deathbody) कुजलेल्या अवस्थेत सापडतो. त्यामुळे या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. या तरुणाचा खून कोणी, कुठे केला या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली. तर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या गावी राहणाऱ्या एका संशयित आरोपीला या घटने संदर्भात अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस या घटनेसंदर्भात संपुर्ण माहिती आज बाहेर काढतील.

सौरभ नंदलाल पाटील 23 वर्ष असं मृत तरुणाचे नाव आहे. पुण्यात काही दिवसांपासून आयटी कंपनीत काम सुरु केलं. काही दिवसांपुर्वी गावातील एका व्यक्तीसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. दोघांचे भांडण कोणत्या कारणावरून झाले हे अद्यापही स्षट नाही. या भांडणाच्या वादावरून सौरभची हत्या करण्यात आली असणार असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीसांनी वाद झालेल्या तरुणाला अटक केली आहे. सौरभला कोणत्या ठिकाणी मारलं आणि कोणत्या हत्याराने खुन केला हे देखील अद्याह स्षट नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आणि मृतदेहावर अनेक मारल्याच्या खूना दिसल्या आहे. त्यामुळे निर्घृण हत्या केल्याचे समोर येत आहे,  पुणे-नाशिक महामार्गालत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात मृतदेह आढळला होता.

28 जुलै पासून सौरभ बेपत्ता होता. त्यामुळे नातेवाईकांनी पोलीसांत  तक्रार केली. आणि पोलीसांनी शोध सुरु केला. तर रविवारी एक मृतदेह हिंजेवाडीत सापडला. नातेवाईंकांनी सौरभात मृतदेह असल्याचे सांगितला. त्या घटनेसंदर्भात पोलीसांनी गावात चौकशी सुरु केली तेव्हा एका संशयित व्यक्तीला अटक केली. एका कारणावरून दोघांचे भांडण झाल्याचे समोर आले आणि त्या कारणाहून सौरभचा खून केला असा संशय आला आहे. पोलीसांनी आज या घटनेसंदर्भात संपुर्ण माहिती बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif