Pune Crime: पुण्यात हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या, लॉजमध्ये सापडला मृतदेह
वंदना द्विवेदी असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती.
पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पुण्यात आयटी हब (Pune IT Hub) हिंजवडीत (Hinjewadi) एका आयटी इंजिनिअर (Pune Crime news) महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडला आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघे ही लखनऊचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने महिलेची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. (हेही वाचा - Pune Crime: महाराजाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील धक्कादायक प्रकार)
हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती. आज सकाळी ऋषभ निगम याने वंदनाची बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. हा हत्येनंतर तो लखनौला जाण्यासाठी पळून गेला.
मुंबई पोलिसांनी प्रियकराला नाकाबंदी दरम्यान पिस्टल सह अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या महिलेची झाल्याचे उघड झालं आहे. आता पोलीस या ऋषभ निगम याची चौकशी करतील. त्यानंतर मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरून वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा समोर येईल.