Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना

Hinjawadi: गुप्तांगास मलम लावून एका तरुणास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पुढे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात ही घटना घडली.

Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे जिल्हा आणि गुन्हेगारी (Pune Crime News) हे समिकरण इतके घट्ट होत चालले आहे की, दररोज काही ना काही खळबळजनक घटना घडतेच. आताही याच जिल्ह्यातीलपिंपरी चिंचवड शहरानजीक असलेल्या आयटीसीटी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणास बेदम मारहाण (Brutally Beaten) झाल्याची घटना घडली आहे. पीडित तरुण 20 वर्षांचा आहे. धक्कादायक म्हणजे, हातातून खाली पडलेले सिगारेट उचलून दिल्याने संतापलेल्या आरोपीने पीडिताच्या गुप्तांगास (Genitals) बाम चोळला (Rubbing Balm) आणि त्यास लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ चित्रीत करुन आरोपीने तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

सिगारेट पडल्यावरुन राग

पुण्यातील वाढती गुन्हेगारीचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेतील तक्रारदार तरुणाचा मित्र हिंजवडी येथील मारुंजी येथील पनाची सोसायटी येथे एका फ्लॅटमध्ये राहतो. या मित्रास भेटण्यासाठी हा तरुण तिथे गेला होता. त्याच वेळी राम तुळशीराम गंभीरे याने तक्रारदाराच्या हातामध्ये सिगारेट दिली. परंतू, घेत असताना ती सिगारेट खाली पडली. या वेळी पडलेली सिगारेट उचलून त्याने ती गंभीरे याच्या हातात दिली. पण त्याचा गंभीरे यास प्रचंड राग आला. त्यातूनच गंभीरे याने तक्रारदार तरुणासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, गंभीरे याने तक्रारदारास तू माझी बरोबरी करतोस काय? असे विचारत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु केली. त्याने या मारहाणीत हातातील कड्याचाही वापर केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने फ्लॅटमधील बाम तक्रारदार तरुणाच्या गुप्तांगास चोळला. त्यामुळे पीडित तरुण असहय्य वेदनेने प्रतिकारहीन बनला. त्याचाही फायदा घेत गंभीरे याने आणखी मारहाण केली. घडल्या प्रकाराचा व्हिडिओही चित्रीत करुन आरोपीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला, अशी माहिती तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत आहे. (हेही वाचा, Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक)

पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, घटनेचे गांभीर्य वेळीच ओळखून पोलिसांनी आरोपी राम तुळशीराम गंभीरे आणि पीडित तरुणास मारहाण करताना आणि अनैसर्गिक वर्तन करण्यास मदत करणाऱ्या इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. श्रेयस कवडे आणि ललित प्रमोद भदाणे अशी गंभीरे याच्यासह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इतर दोघांची नावे आहेत. (हेही वाचा, Daund English Medium School: वर्गातील मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यासाठी शाळेतील मित्रास 100 रुपयांची सुपारी, दौंड येथे धक्कादायक प्रकार)

हिंजवडीत घडलेल्या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा आहे. पाठिमागील काही काळापासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. कधी कोयता गँग, कधी खंडणी, कधी बलात्कार तर कधी आलिशान वाहनांखाली सामान्यांना चिरडणे अशा घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement