Pune Crime: पिझ्झा उशीरा आणला म्हणून तरुणाची डिलीव्हरीला बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार, परिसरात घबराट
एवढ्यावरच न थांबता या तरुणाने हवेत गोळीबार देखील केला आहे. या प्रकरणी आरोपीवर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात पोलिसांचा धाक कोणाला उरला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्यात चपलेच्या दुकानात दुकान मालकावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच वाघोली परिसरात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशिर झाल्यानं चिडलेल्या तरुणाने डिलिव्हरी बॉयला बेदम मारण केलीये. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने हवेत गोळीबार देखील केला आहे. या प्रकरणी आरोपीवर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (हेही वाचा - Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण)
मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. रोहित असं डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. तो वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉयला उशिरा पोहोचवल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रोहितला मारण केली. या महाराणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर काहीजण गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण केली. तसेच यावेळी त्याने आपल्या गाडीमधून पिस्टल काढून हवेत गोळीबार केला.
या घटनेनंतर पिझ्झा कंपनीच्या लोकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून पुढील तपास हा सुरु आहे.