Pune Suicide: पुण्यात मित्राला चिठ्ठी पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

ज्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

पुण्याच्या खडकवासला धरणात तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिकेत सुनिल आल्हाट असे या तरुणाचे नाव असून पुण्यात नऱ्हे या ठिकाणी तो राहत होता. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. 'मी आत्महत्या करत आहे ,माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये' अशी चिठ्ठी लिहून अनिकेतने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मे ला अनिकेत कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यांने कागदावर आत्महत्या करत असल्याचे कागदावर लिहून त्याचा फोटो काढून मित्राच्या व्हॉटसअॅपवर पाठवली होती. अनिकेतच्या या मॅसेजने मित्राला धक्काच बसला त्याने या मॅसेजबाबतची माहिती अनिकेतच्या घरच्यांना दिली. तसेच कुटूंबियांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

घरातून निघून गेल्यानंतर अनिकेतने मोबाईल बंद करून ठेवल्याने त्याचा संपर्क होत नव्हता. अनेक ठिकाणी कुटूंबियांनी शोधाशोधही केली. अखेर अनिकेतचा मृतदेह खडकवासला धरणाच्या पाण्यावर पंप हाऊस जवळ तरंगताना आढळून आला. ज्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली